आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 जून 2021

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya
Summary

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध २, मु. जिल्काद मासारंभ, पारशी बेहमन मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४३.

पंचांग - १२ जून २०२१, शनिवार : ज्येष्ठ शुद्ध २, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ७.१६, चंद्रास्त रात्री ८.५८, मु. जिल्काद मासारंभ, पारशी बेहमन मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४३.

दिनविशेष

१९०५ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसह 'भारत सेवक समाज' ही संस्था स्थापन केली.

१९९३ : जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या 'पृथ्वी" क्षेपणास्त्राची अकरावी चाचणी यशस्वी.

२००० : आपल्या सव्यसाची, बहुरूपी व अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर प्रदीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजविणारे व त्यांची अभिरुची संपन्न करणारे आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांचे निधन.

राशिभविष्य

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

वृषभ: उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक सुय लाभेल.

मिथुन: तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क: काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

कन्या: आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्चिक : वादविवाद टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल..

धनू : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मकर: खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन: मन आनंदी व आशावादी राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com