अशी बोलते माझी कविता (डॉ. अनुजा जोशी)

डॉ. अनुजा जोशी dr.anupamj@gmail.com
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर...

तो उतरतो आईचा हात घट्ट धरून
‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर
मागं मागं वळून बघत राहतो
जात राहतो फरपटणाऱ्या पायांबरोबर
आईनं घट्ट धरलेल्या हातांबरोबर

फोलपटागत पोकळ नजर
निरर्थकाचं हसं
आणि भिरभिरता अस्ताव्यस्त आनंद घेऊन
तो चालत राहतो शाळेची वाट आईबरोबर

पुन्हा पुन्हा बघतो सुटलेल्या बसकडं
रस्त्याकडेच्या कुत्र्याकडं
आईच्या पदराकडं
शर्टवर सांडणाऱ्या लाळेकडं
नि समोरच्या शाळेकडं बघत राहतो

‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर...

तो उतरतो आईचा हात घट्ट धरून
‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर
मागं मागं वळून बघत राहतो
जात राहतो फरपटणाऱ्या पायांबरोबर
आईनं घट्ट धरलेल्या हातांबरोबर

फोलपटागत पोकळ नजर
निरर्थकाचं हसं
आणि भिरभिरता अस्ताव्यस्त आनंद घेऊन
तो चालत राहतो शाळेची वाट आईबरोबर

पुन्हा पुन्हा बघतो सुटलेल्या बसकडं
रस्त्याकडेच्या कुत्र्याकडं
आईच्या पदराकडं
शर्टवर सांडणाऱ्या लाळेकडं
नि समोरच्या शाळेकडं बघत राहतो

त्याला लावता येत नाही
वेगवेगळ्या दिसणाऱ्या या गोष्टींमध्ये एकसंगती
त्याला अडकवता येत नाहीत
या सुट्या सुट्या ठोकळ्यांच्या खाचा
एकमेकांत घट्ट
त्याला ओवता येत नाहीत
परिणामांचे मणी कृतीच्या दोऱ्यात

‘स्पेशल स्कूल’च्या स्टॉपवर
उतरून जातो मुलगा
आईचा हात घट्ट धरून
नि मला लावता येत नाही त्याची संगती
माझ्या मेंदूत सुसंगत जुळलेल्या
एकाही पेशीबरोबर

- डॉ. अनुजा जोशी,
वाळपई (ता. सत्तरी) गोवा
९४२३३०८७५०

Web Title: dr anuja joshi's poem

टॅग्स
फोटो गॅलरी