अशी बोलते माझी कविता (डॉ. भाग्यश्री कुलगुडे)

डॉ. भाग्यश्री कुलगुडे मु. पो ः कर्जत (ता. जि. रायगड) (८८०५५८१९९७)
रविवार, 22 जानेवारी 2017

अस्तित्व

माहीत नाही कितीदा
तिचा सराईत हात
फिरत राहायचा
चहाच्या करपल्या पातेल्यावर
कणकेच्या परातीवर
सिलिंडरमागच्या जाळीवरही

लख्ख होणारं पातेलं
तेलकट कढया
छोटे-मोठे कोपरे
सुखावत राहायचे तिला
डागविरहिततेतून...

न दिसणाऱ्या जखमा
नात्यांचं रुतणारं जोखड
संस्कारांच्या न तुटणाऱ्या बेड्या
अस्पष्टच होत जायच्या
त्या लखलखीत परावर्तितात...

ती पुनःपुन्हा घासत राहायची
ओट्याची फरशी
धूत राहायची मळकट कपडे
कोपरा फाटलेलं पायपुसणं
पिळत राहायची पिळे

अस्तित्व

माहीत नाही कितीदा
तिचा सराईत हात
फिरत राहायचा
चहाच्या करपल्या पातेल्यावर
कणकेच्या परातीवर
सिलिंडरमागच्या जाळीवरही

लख्ख होणारं पातेलं
तेलकट कढया
छोटे-मोठे कोपरे
सुखावत राहायचे तिला
डागविरहिततेतून...

न दिसणाऱ्या जखमा
नात्यांचं रुतणारं जोखड
संस्कारांच्या न तुटणाऱ्या बेड्या
अस्पष्टच होत जायच्या
त्या लखलखीत परावर्तितात...

ती पुनःपुन्हा घासत राहायची
ओट्याची फरशी
धूत राहायची मळकट कपडे
कोपरा फाटलेलं पायपुसणं
पिळत राहायची पिळे

शोधत राहायची
पारा उडालेल्या
गंजक्‍या पत्र्याला चिकटलेल्या
निर्जीव काचेमधल्या त्या
स्पष्ट-अस्पष्ट प्रतिमेतून
तिच उरलं अस्तित्व !

Web Title: dr bhagyashree kulgude's poem in saptarang

टॅग्स