अशी बोलते माझी कविता (डॉ. दिलीप पां. कुलकर्णी)

डॉ. दिलीप पां. कुलकर्णी, कुरुंदवाड (कोल्हापूर) ९८२२२३१८६८
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

कळेना !
मला हे कळेना, मला ते कळेना!
कुठे संभ्रमांचे विधाते? कळेना!

युवा टाळती सैनिकी, शेतकीही
उद्या कोण देशास त्राते? कळेना!

स्वतःचे कसे गोडवे संस्कृती ही-
-विदेशीय चालीत गाते? कळेना !

चिणे माय गर्भाशयी स्त्री-भ्रुणा हे-
-असे कोणते रक्तनाते? कळेना!

कसे हे? पिले पाळण्यांच्या घरी अन्‌
वयस्काश्रमी जन्मदाते? कळेना!

मनी बी न घालूनही पीठ सांडे
दळे का स्वतःलाच जाते? कळेना!

मला पोसणारे कसे चक्क माझ्या-
-क्षयाचे निघाले चहाते? कळेना!

कळेना !
मला हे कळेना, मला ते कळेना!
कुठे संभ्रमांचे विधाते? कळेना!

युवा टाळती सैनिकी, शेतकीही
उद्या कोण देशास त्राते? कळेना!

स्वतःचे कसे गोडवे संस्कृती ही-
-विदेशीय चालीत गाते? कळेना !

चिणे माय गर्भाशयी स्त्री-भ्रुणा हे-
-असे कोणते रक्तनाते? कळेना!

कसे हे? पिले पाळण्यांच्या घरी अन्‌
वयस्काश्रमी जन्मदाते? कळेना!

मनी बी न घालूनही पीठ सांडे
दळे का स्वतःलाच जाते? कळेना!

मला पोसणारे कसे चक्क माझ्या-
-क्षयाचे निघाले चहाते? कळेना!

गमे, नेक हाती पडो अर्ज माझा
परी कोण ना लाच खाते? कळेना!

Web Title: dr dilip kulkarni's poem

टॅग्स
फोटो गॅलरी