मी पाणी आहे!

समुद्रावर पडणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी ढग बनतं आणि आपल्या वर्षावाने संपूर्ण पृथ्वी ओलसर करतं.
sea water
sea watersakal
Summary

समुद्रावर पडणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी ढग बनतं आणि आपल्या वर्षावाने संपूर्ण पृथ्वी ओलसर करतं.

- डॉ. राजेंद्रसिंह, saptrang@esakal.com

ज - जीवन आहे मी. ल - मी पाच महान तत्त्वांचं विलीनीकरण आहे. म्हणजे मी देव आहे. मी भू - भूमी, ग - गगन, वा - वायू, अ - अग्नी, न - नीर (पाणी) आहे. या विश्वाचा निर्माताही मीच आहे. मी द्रव, वायू आणि घन अवस्थेमध्ये मानवी आणि नैसर्गिक वापरात येतो. मी निसर्ग आणि मानवतेचं नातं आहे. संपूर्ण नैसर्गिक भाग मानवाला शिस्तबद्धपणे वागायला शिकवतो. मी मानवी जीवन, निर्वाह आणि विवेक आहे. मी द्रव, घन आणि वायू या तिन्ही रूपांमध्ये प्रकट होतो. मला द्रवरूपात पितात, तर घन स्वरूपात खाताही येतं. मी प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. मी प्रत्येकाचं आयुष्य बनवतो. कधी माझ्या एखाद्या आपत्तीत ते खराबही होऊ शकतं.

उन्हात जेव्हा एखादी व्यक्ती मला स्पर्श करते, तेव्हा मी त्याची तहान शमवू लागतो. तहान शमल्यानंतरही माझी भावना घशात आणि ओठांमध्ये राहते, त्यातून मला मानवी जीवनातील माझी उपयुक्तता जाणवते. कोरडी माती निर्जीव असते. जेव्हा मी तिला भेटतो, तेव्हा त्या मातीत नवीन जीव ओततो. तिच्या आत बीज अंकुरित करून मी एक नवीन जीवन तयार करतो.

समुद्रावर पडणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी ढग बनतं आणि आपल्या वर्षावाने संपूर्ण पृथ्वी ओलसर करतं. मी सूर्याच्या उष्णतेने तयार झालेल्या ढगांना हिरवाईकडे नेतो. उन्हाळ्याच्या प्रखर उष्णतेने ढग बनून, माझं पावसाचं रूप बनून, मी मातीत मिसळतो. निर्जीव मातीला जीवदान देऊन मी तिला हिरवीगार करत आलो आहे. त्या मातीतून मी नवसृजन करत असतो. मी समुद्रात राहून सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेची निर्जीव उष्णतेशी अदलाबदल करतो.

मी जंगलातील पानं, देठ आणि मुळांमध्ये राहून या लाल उष्णतेचं रूपांतर हिरव्या उष्णतेमध्ये करतो. निळा घन आणि हिरवी उष्णता एकत्र येऊन नवीन उत्पादक पाऊस तयार करतात. मग पृथ्वीवर धावत, मी सरकतो आणि चालतो. माझ्यासोबत माती वाहत राहते. जिथं राहण्याची सोय आहे, तिथं मी पुन्हा नवी हिरवाई आणतो. माझ्या आतल्या उष्णतेतून ही नवी हिरवळ जन्माला आली आहे. मी चार प्रकारची उष्णता आहे. लाल- निळी- हिरवी- पिवळी मी जीवनाचं संपूर्ण वर्तुळ आहे. माझ्या या चक्राला लोक ‘पावसाचं चक्र’ असंही म्हणतात.

मी संसारात लीन आहे. जग माझ्यात सामावलेलं आहे. मी महासागर निर्माण करतो आणि सूर्याची उष्णता कमी करून मी मनुष्य आणि सजीवांसाठी उपयुक्त बनतो. मी पृथ्वीचा आणि मानवाचा तापही बरा करतो. मी नद्या-नाल्यांतून वाहून पृथ्वीच्या प्रत्येक कणाचं उत्पन्न वाढवतो.

मग मी स्वतःला पिवळ्या उष्णतेमध्ये बदलतो. सूर्याची निर्जीव लाल उष्णता मला समुद्रात भेटते, जिवंत निळ्या उष्णतेमध्ये बदलते, हिरव्या उष्णतेच्या वर पोहोचते व मी पाऊस, पिवळी उष्णता निर्माण करू लागतो. माझ्याशिवाय पृथ्वी ही आई होऊ शकत नाही. पृथ्वीला माता बनवणारं पाणी मी आहे. माझं वर्तुळ हे मानवता आणि निसर्गाचं वर्तुळ निर्माण करतं. मी धुणं, मळणं, वितळणं, विरघळणं, थंड करणं, तसंच वाहतूक व्यवसाय, रंगरंगोटी, शेती, पशुपालन, कुंभार, धोबी, चामडं कमावणं, लोहार, सुवर्णकार, साखर, कागद, लोखंड, कापड, तेल शुद्धीकरण असे उद्योग चालवतो.

मी माणसाची तहान भागवतो. मी प्राणी, पक्षी, कीटक, पतंग, झाडं आणि वनस्पती आहे. माझ्याशिवाय कोरड्या पृथ्वीवर काहीही उगवत नाही. बियाणं अंकुरित करणारा मीच आहे. निर्जल शरीरात जो मीठ आणि साखर मिसळून त्याचा जीव वाचवतो तो मी आहे. मी समुद्रापासून सूर्यापर्यंत प्रवास करून या पृथ्वीला जिवंत ठेवतो. मी संपूर्ण विश्व निर्माण करतो आणि चालवतो, तरीही मला ते जाणवत नाही. मी माणसाशी एकनिष्ठ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य विविध कार्यं करतो. जसं की - कपडे, शरीर, भांडी, फरशी, उपकरणं, भाजीपाला इत्यादी धुणे; मैदा, सिमेंट मळण्याचं काम मी एकटाच करतो.

जीवन बनवण्यापासून ते वितळणं, विरघळणं, थंड करणं ही सर्व कामं मी करतो. माझ्याशिवाय शहरं आणि गावं निराधार, निरुपयोगी, आजारी आणि उजाड होतात. आग्रा, फतेहपूर, शिकरी राजधानीपर्यंत उजाड झाले आहेत. मीच यमुनेमध्ये येऊन दिल्लीची स्थापना केली. लंडनही माझ्यामुळे थेम्सच्या काठावर वसलं होतं. मी जीवनातील सर्व कार्यं करतो. शेती, पशुपालन, मासेमारी, उद्योग, पूजा हे सर्व मी करतो. अन्न-विचार, आनंद-अभिमान हे सर्व मला आहेत. म्हणूनच माझ्या प्रमाणाच्या उपलब्धतेच्या आधारे राजस्थानच्या वाळवंटात ‘सर’ ताल झालर या नावाने वस्ती होत असे. गावांची नावं माझ्याशी जोडलेली होती. मी मनुष्याचं जीवन, पालन-पोषण आणि विवेक आहे. मी नद्या, तलाव, महासागर सर्वत्र राहतो.

ढग आणि बर्फाच्या कणांच्या रूपात वाफ हवेत राहते. जेव्हा मी मातीत असतो, तेव्हा मला ओलावा म्हणतात. जमिनीच्या खाली मला भूजल म्हणतात. मी ध्रुवीय प्रदेश आणि पर्वतशिखरांवर बर्फाच्या स्वरूपात राहतो. मी वनस्पती आणि प्राण्यांमध्ये जीवन आहे. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारा पृथ्वीवरील पाऊस मी आहे. मी पर्वताच्या शिखरावरून बर्फस्वरूपात वितळतो आणि नद्या तयार होतात. माझ्याकडे सर्व काही आहे. मी क्षार, धातू, हायड्रोजन- ऑक्सिजन असे वायू यांनी बनलेला आहे. कार्बन डाय-ऑक्साइड येतो आणि माझ्यात मिसळतो.

नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड इत्यादींद्वारे मी जलचर वनस्पती आणि एकपेशीय वनस्पती बनवतो. माझ्याशिवाय नदी-नाले, सर्व वनस्पती आणि एकपेशीय वनस्पतीसुद्धा सुकतात. माझ्यापासून सूर्य आणि वायू मिळून पहिली वनस्पती निर्माण झाली. मग जीव, प्राणी निर्माण झाले. शेवटी मी मनुष्य निर्माण केला आहे. याला जीवनचक्र असंही म्हणतात. हे जीवनचक्र माझ्या चक्रातूनच निर्माण झालं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे; परंतु लोकांना याचा विसर पडू लागलेला आहे. सर्व मानवांच्या मनातून आणि हृदयातून माझा आदर करण्याची आणि माझ्याबद्दल शिस्त बाळगण्याची परंपरा भारतीय मानवी ज्ञानप्रणालीतून जणू काही संपूच लागलेली आहे.

कदाचित त्यामुळेच माझं शुद्धीकरणदेखील वर्तन आणि पुनर्वापराच्या संस्कृतीतून काढून टाकलं जाऊ लागलं आहे. जे विनासायास, सहजासहजी उपलब्ध होतं त्याचा विसर पडतो, या उक्तीप्रमाणे माणूस आता माझं महत्त्व आणि जीवनातील माझी अनन्यता जणू काही विसरलाच आहे. मी संपूर्ण निसर्ग आणि मानवतेला पुनरुज्जीवित करण्याचं काम करतो, तरी आज माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

आकाशातील ढग बनून मी पाण्यासह संपूर्ण पृथ्वीवर पोहोचतो. लोक सकाळ-संध्याकाळ तलावात मला भेटायला यायचे. मी सकाळ- दुपार- संध्याकाळ रंग बदलतो. घरातील किचनमध्येही मी चवीने आणि फळं-फुलं-पानांनी सजावट करतो. स्त्रिया मला सजवून माझा आदर करतात. मी जल-स्त्री-नदी आहे. जल-जीवन, स्त्री-माता, मी नदीचा प्रवाह आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय जल-पर्यावरण तज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कारविजेते आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com