सोशल मीडियावरचं गाजलेलं... (डॉ. वैष्णवी देव)

डॉ. वैष्णवी देव vaideoshrikant@gmail.com
रविवार, 9 एप्रिल 2017

‘सेकंड डिलिव्हरी’ आणि ती...

माझे एक आवडते पेशंट म्हणजे दुसरी ‘डिलिव्हरी’ झालेल्या बायका. आधीचं एक तीन-चार वर्षाचं पिल्लू असतं आणि दुसरी डिलिव्हरी होते. या बायका अजिबात त्रास देत नाहीत, फार पटकन बऱ्या होतात. संसार करून पाच-सहा वर्षं झालेली असतात, बऱ्यापैकी सवय झालेली असते. बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड असतात.

जायच्या दिवशी तर फार छान आवरतात, तिच्या डोक्‍यात आता पुढचे वेध असतात, आपला संसार वाट बघत असतो, तीन-चार दिवसांत घरी काय गोंधळ झाला असेल हा विचार असतो. नवऱ्याची, मुलाची थोडी आबाळ झालेली असते, लगेच ती पिल्लं बारीक होऊन दाखवतात. घरी गेल्यावर सगळं परत ठाकठीक करायचं असतं. छोटं इकडे-तिकडे करत असतं. आईनं बाळ आणलं म्हणून खूष असतं. आता आईला घेऊन घरी जायचं म्हणून उड्या मारत असतं. ती थकलेली असते, थोडं दुखत असतं पण उभी राहते. खूप कामं वाट बघत असतात.

...आणि मग ते नवं-दुपट्यात गुंडाळलेलं, नवरा, असंख्य पिशव्या आणि तीन-चार वर्षाचं असे सगळे आपल्या नवीन आयुष्याच्या नव्या जबाबदाऱ्यांना सामोरे जातात.

Web Title: dr vaishnavi deo wirte social media article in saptarang