निवडणुकीचा 'चाणक्य' नव्या रोजगाराच्या शोधात

prashantkishor.jpg
prashantkishor.jpg

भारताच्या राजकीय जीवनातील २०११ ते २०१४ ही महत्त्वाची चार वर्षे. यात केवळ सत्तापालट होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असे नाही, तर त्याने येथील समाजकारण आणि राजकारणाची दिशा बदलली. याच काळातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रोपगंडा. भारतात दूरचित्रवाणीचे आणि त्यातही वृत्तवाहिन्यांचे युग आल्यानंतर प्रोपगंडा संकल्पना जोर धरणारच होती. प्रोपगंडा हे सगळ्यात प्रभावी साधन आहे. त्याला आता माहितीक्रांतीची जोड मिळाली होती. ‘टू-जी’ हा यूपीए सरकारमधील ए. राजा आणि कनिमोळी यांच्या घोटाळ्यांमुळे बदनाम झालेला शब्द; पण त्याच टू-जीने येथे दूरसंचार क्रांतीही झाली होती. इंटरनेट घराघरांत पोहोचले होते. प्रचलित माध्यमांना समाजमाध्यमांची स्पर्धा निर्माण झाली होती. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ूब या समाजमाध्यमांमुळे येथील तरुण पिढीला आपण सक्षम झाल्याचे वाटू लागले होते. यातूनच प्रोपागंडाची लाट निर्माण झाली. त्या लाटेच्या केंद्रस्थानी होते नरेंद्र मोदी. प्रोपगंडा त्यांचा एकटय़ाचाच होता असे नव्हे. बाकीच्या पक्षांचा पण होता; पण मोदी यांनी जे सुरू केले होते, तो ‘न भूतो’ असा प्रकार होता. त्याचा सुरुवात शोधणे कठीण आहे; परंतु त्या एकरेषीय प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर.

प्रशांत किशोर हे गेल्या काही दिवस चर्चेत नव्हते. माध्यमांनी तसेच राजकीय अभ्यासकांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आता ते अचानक चर्चेत आले आहेत. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते कोणासाठी रणनीती ठरवणार याच्या बातम्या येऊ लागल्या. वर्षभरापुर्वी त्याचे नाव गाजत होते, ते उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीतला कॉग्रेसचा चाणक्य म्हणून! त्यापुर्वी त्यांनी बिहारमध्ये मोदीलाट थोपवून दाखवली, म्हणून त्यांची स्तुती होत होती. त्यानंतरच पंजाबच्या विधानसभा निवडणूकांसाठी कॉग्रेसनेते अमरिंदर सिंग यांनी त्याची मदत मागितल्यानंतर प्रशांत किशोरने ती ऑफ़र स्विकारली होती. त्याच दरम्यान काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या टीमकडे कार्यकर्ते व मतदारांना 'मॅनेज' करण्याचं काम दिलं आहे. 'पीके' यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसनं यूपीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला आणि प्रचारालाही सुरुवात केली. 

हे सगळं असलं तरी दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना 'पीके' यांना पचवणं जड जात होतं. 'पीके' यांनी काँग्रेससाठी आखलेल्या योजनांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या निराशाजनक प्रतिसादातूनच हे समोर येत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी 'पीके' यांनी दोन योजना आखल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन करून सतत त्यांच्या संपर्कात राहणे व काँग्रेसपासून लांब गेलेल्या लोकांशी संपर्क साधून पुन्हा त्यांना पक्षाशी जोडणे अशा त्या योजना होत्या. मात्र, त्यात खोडा घालण्याचं काम काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले. त्याचा होईचा तो परिणाम झाला आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीनंतर प्रशांत यांच्या कामांविषयी संशय निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्या अपयशाखाली त्यांनी मिळवलेले पंजाबचे यश झाकले गेले होते. उत्तरप्रदेशातील अपयशाने मात्र प्रशांत काहीसे अडगळीत पडले. 

आज घडीला हा २०१४ चा चाणक्य काय करतो, तेही कोणाच्या लक्षात नाही. मिळालेल्या माहितीनुसार सध्या ते आता तमिळनाडूत आपल्या 'पॉलिटिकल स्ट्रॅटेजी'चं नशीब आजमावून पाहाणार आहेत. तमिळनाडूतील डीएमके पक्षाची रणनीती आखण्याचं काम प्रशांत किशोर यांना देण्यात येणार आहे. याबाबत इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमेटीशी त्यांची बोलणी सुरू आहे. पण अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.  २०१९ सालच्या लोकसभेसाठी कॉग्रेस वा भाजपचे काम मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यापैकी कॉग्रेसचे काम त्याला मिळायचे गतवर्षीच नक्की झाले होते. पण उत्तरप्रदेशच्या निकालांनी तो विषय पडला आहे. 

आता प्रशांत यांना नुसती निवडणूक कुठल्या तरी पक्षाला जिंकून देण्यापुरते आव्हान उरलेले नाही. उत्तरप्रदेश निवडणुकीत गमावलेली प्रतिष्ठा नव्याने मिळवावी लागणार आहे. आपल्या योजनांची जादू कायम असल्याचे त्यांना नव्याने सिद्ध करावे लागणार आहे. प्रशांत याना आता लोकसभेसाठी मोठा राष्ट्रीय पातळीवरचा ग्राहक हवा आहे. म्हणजेच काँग्रेस किंवा भाजप या दोन्हीमधील एक पर्याय आहे. ते भाजपबरोबर जातील अशी चर्चा सुरु आहे. मात्र प्रशांत यांच्या टीमने याचा इन्कार केला आहे. भविष्यात प्रशांत यांचे कोण ग्राहक असतील आणि ते आपली प्रतिष्ठा कशी परत मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com