सरकारी नोकरी उपलब्ध! 'ईपीएफओ'मध्ये 280 जागांची भरती सुरू 

शनिवार, 1 जून 2019

कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) 280 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. 'ईपीएफओ'ने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, या जागांसाठीच्या भरतीची प्रक्रिया 25 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) 280 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. 'ईपीएफओ'ने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, या जागांसाठीच्या भरतीची प्रक्रिया 25 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. 

'ईपीएफओ'मध्ये सहाय्यक पदांसाठीची ही भरती सुरू आहे. यासाठीची नोंदणी ऑनलाईनच करायची आहे. नोंदणीची मुदत संपल्यानंतर 20 जुलै ते 30 जुलै या कालावधीत मुलाखतीसाठीचे पत्र डाऊनलोड करून घेता येईल. या पदांसाठी मासिक वेतन रुपये 44,900 इतके असेल. याशिवाय महागाई भत्ता, घरभत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे. 

या एकूण 280 जागांपैकी 118 जागा खुल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी 28, अनुसूचित जातींसाठी दोन, अनुसूचित जमातींसाठी 21 आणि इतर मागासवर्गीय जातींसाठी 76 जागा आहेत. या भरतीसाठी प्रवेश परीक्षा असेल. ही प्राथमिक परीक्षा 30 आणि 31 जुलै रोजी होईल. मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 

अर्ज कसा भरणार? 
- 'ईपीएफओ'च्या अधिकृत संकेतस्थळावर जा 
https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
- 'रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट्‌स' या टॅबवर जा 
- वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा 
- सेव्ह केल्यानंतर नोंदणी शुक्‍ल भरा 
- सर्व माहितीची खातरजमा करून 'फायनल सबमिट'वर क्‍लिक करा 

इतर महत्त्वाची माहिती 
- ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख : 25 जून 
- नोंदणी फक्त ऑनलाईनच असेल; इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत 
- इच्छुक उमेदवारांचे 4.5 सेंटिमीटर-3.5 सेंटिमीटर या आकारातील छायाचित्र आवश्‍यक असेल 
- उमेदवाराने इंग्रजी भाषेत स्वत:च्या अक्षरात भरलेले एक पत्रही सादर करावे लागेल. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनेच हे पत्र लिहिणे आवश्‍यक आहे. यासंदर्भातील इतर तपशील इथे वाचा 
https://ibpsonline.ibps.in/epfoamay19/uploads/loadpdf.php?file=k7m5p+fQ15etytHiwtbG45qfmdWyp5rXppSo3aRx&t=zLjIrOLC1Ni005njxc8=#toolbar=0&navpanes=0
- वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्ही चालू असल्याची खात्री करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPFO has 280 job recruitment