
रंगांचा समन्वय असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्याही प्रसंगासाठी साडी नेसायचे ठरवले, तर लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी साडीच्या रंगाला साजेसे ब्लाऊज निवडले पाहिजे
‘व्यक्तिमत्त्वानुसारच रंगांची निवड हवी’
- साची तिवारी
कॅज्युअल पोशाख हा माझा आवडता वॉर्डरोब आहे. तुम्ही प्रवास करणार असाल, डिनरसाठी बाहेर जाणार असाल, शॉपिंग किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहायला जात असाल, तर अशा प्रत्येक प्रसंगासाठी हे सर्वांत उत्तम व आरामदायी पोशाख आहेत. जीन्स व टी-शर्ट, स्कर्ट टॉप किंवा इतर कोणताही फुलांचा ड्रेस माझे गो-टू पोशाख आहेत. मला साडी नेसायलादेखील आवडते आणि ‘अँड टीव्ही’वरील ‘बाल शिव’ या मालिकेमध्ये सुमतीची भूमिका साकारताना नियमितपणे साडी नेसाण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत आहे. फॅशन करताना, पोशाख परिधान करताना, साडी नेसताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. माझ्या मते, तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे पोशाख परिधान करण्यासंदर्भात तर आवर्जून काळजी घेतली पाहिजे.
रंगांचा समन्वय असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्याही प्रसंगासाठी साडी नेसायचे ठरवले, तर लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी साडीच्या रंगाला साजेसे ब्लाऊज निवडले पाहिजे. तुम्हाला आकर्षक वाटेल आणि तुमचा लूक व स्वास्थ्य सुधारेल असा पोशाख किंवा साडी निवडा. त्यातून तुमचे व्यक्तिमत्व बहरून येईल. इतरांपेक्षा वेगळे व उठून दिसण्यासाठी मी नेहमीच माझ्या पोशाखाशी परिपूर्णपणे न जुळणारी आभूषणे परिधान करते आणि पोशाखाशी पूरक रंगसंगतींची निवड करते. मी रंगांच्या बाबतीत गडद व हलके किंवा हलके व गडद अशी निवड करते. मला थोडाच मेकअप करायला आवडते.
बहुतांश व्यक्तींचा स्वत:चा आवडता रंग असतो आणि ते त्या रंगाचा अधिकाधिक अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. पण पोशाखासंदर्भात माझ्या मते तुमचा लूक व व्यक्तिमत्त्वाला साजेशा अशा रंगाची निवड करावी. मग तो रंग तुमचा आवडता नसला तरी चालेल. साध्या लुकसाठी जे आकर्षक दिसते त्यापेक्षा तुमच्या स्किन टोनशी जुळणाऱ्या रंगांची निवड करा. माझी स्टाइल आयकॉन अमेरिकन गायिका-अभिनेत्री झेन्दया आहे. ती परिधान करणारा प्रत्येक पोशाख सुंदर दिसतो. मला तिचे सर्व पोशाख आणि तिच्या स्टाइलिंग निवडी खूप आवडतात, जे नेहमी मोहक दिसतात.
फॅशन टिप्स
तुमचे पोशाख तुमच्या शरीराला व्यवस्थित फिट बसले पाहिजेत, अशीच त्यांची रचना हवी
प्रत्येकीने बेल्ट, चोकर किंवा अँकलेटचा वापर करत सर्वांत फॅशनेबल पद्धतीने आभूषणे परिधान केली पाहिजेत.
तुम्हाला शोभून दिसणाऱ्या रंगांची निवड करा. कारण, त्यामुळे आपण स्वतः आनंदी राहतो अन् त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो.
मेकअप कमीत कमी करा. कारण, मेकअप जास्त केला अन् त्यात भडकपणा आणला तर ते काहीतरी विचित्र वाटेल.
कोणताही ट्रेंड नवीन आला किंवा एखादा ट्रेंड जुना असला तरी चालेल. मात्र, तो आपल्यावर किती प्रमाणात सूट होतोय, याचा विचार करा. दुसरे फॉलो करतात म्हणून आपणही तो ट्रेंड आंधळेपणाने फॉलो करू नका.
Web Title: Fashion Tips Choose Colors According To Personality
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..