#KhaayeChaleJaa चटकदार नॉन व्हेजसाठी मस्त पर्याय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 July 2019

क्‍या मौसम है... मस्त पाऊस पडतोय,सृष्टी हिरवीगार झाली आहे. निसर्गरम्य वातावरण आहे,अशा वातावरणात चविष्ट आणि चटकदार नॉन व्हेज खाण्याची इच्छा नाही झाली तर नवलच. पण यासाठी फार शोध घेण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्या फिश, चिकन, मटणाच्या सुंदर, लज्जतदार डिशेससाठी पुण्याचे 'फिश करी राईस' रेस्टॉरंट आपल्या सेवेस हजर आहे.

खाए चला जा : पुणे : क्‍या मौसम है... मस्त पाऊस पडतोय,सृष्टी हिरवीगार झाली आहे. निसर्गरम्य वातावरण आहे,अशा वातावरणात चविष्ट आणि चटकदार नॉन व्हेज खाण्याची इच्छा नाही झाली तर नवलच. पण यासाठी फार शोध घेण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्या फिश, चिकन, मटणाच्या सुंदर, लज्जतदार डिशेससाठी पुण्याचे 'फिश करी राईस' रेस्टॉरंट आपल्या सेवेस हजर आहे.

पुण्यामध्ये चविष्ट फिशच्या डिशेससाठी प्रसिद्ध असलेल्या फिश करी राईसचा प्रवास आता नारायण पेठ ते बाणेर व्हाया लॉ कॉलेज रोड असा येऊन ठेपला आहे. नुकतीच 10 वर्ष पूर्ण केलेल्या फिश करी राईसचा हा प्रवास निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

लॉ कॉलेज रोड तसेच बाणेर येथे दोन्ही ठिकाणी फिश करी राईस मध्ये फिश, चिकन मटण यांच्या वैशिष्ट्य पूर्ण विविध थाळ्या मिळतात. दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास पारंपरिक गोवन फिश थाळी येथे सुरु झाली आहे आणि तीही फक्त 400 रुपयांत.

No photo description available.

सध्याच्या पावसाच्या दिवसात घराबाहेर ना पडता घरीच पार्सल मागवणे ग्राहक पसंत करतात. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी 200 रुपयांपासून पुढे कोणत्याही डिशेस सर्व फूड डिलिव्हरी पोर्टल्सवर उपलब्ध आहेत. खूप भूक असेल तर थाळी किंवा इतर डिशेस इथे आहेतच पण भूक थोडीच असेल काही फक्त 300 रुपयांत कॉम्बो मिल्स फिश करी राईसच्या मेनू कार्ड मध्ये सादर केला आहे.

लहान मुलांसाठी इथे फक्त 300 रुपयांत किड्‌स स्पेशल थाळी देखील इथे मिळत असल्याने फिश व नॉन व्हेज प्रेमी फॅमिलीसाठी फिश करी राईस रेस्टॉरंटच्या लॉ कॉलेज रोड व बाणेर येथील दोन्ही शाखांना ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी आणि उत्कृष्ट नॉनव्हेजचा आनंद घ्यावा असे आवाहन मालक संदेश भट यांनी केले आहे. 

(Sakal Reader Connect Initiative)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish Curry Rice restaurant in Pune