प्रेमाच्या गावा जावे (गोबिंद प्रसाद)

गोबिंद प्रसाद
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

तुझं येणं

तुझं येणं म्हणजे
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं
स्वप्न
तुझं येणं म्हणजे
दिव्यातल्या वातीचं अचानक
तेवणं

तुझं येणं
सुन्या आकाशात हळू हळू
उगवावा जसा तारा
तुझं येणं
नसानसातून खळाळतोय
जणू काही पारा!

तुझं येणं
जसं रात्रीच्या नीरवतेत
बुडून गेलेलं कुठलंसं शहर
तुझं येणं
जणू काही
निर्जन भग्नावशेषांत
फुलावा अचानक बहर!

- गोबिंद प्रसाद (जन्म ः १९५५) (विख्यात हिंदी कवी)

तुझं येणं

तुझं येणं म्हणजे
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं
स्वप्न
तुझं येणं म्हणजे
दिव्यातल्या वातीचं अचानक
तेवणं

तुझं येणं
सुन्या आकाशात हळू हळू
उगवावा जसा तारा
तुझं येणं
नसानसातून खळाळतोय
जणू काही पारा!

तुझं येणं
जसं रात्रीच्या नीरवतेत
बुडून गेलेलं कुठलंसं शहर
तुझं येणं
जणू काही
निर्जन भग्नावशेषांत
फुलावा अचानक बहर!

- गोबिंद प्रसाद (जन्म ः १९५५) (विख्यात हिंदी कवी)

(‘प्रेम’ या विषयाचे विविध पैलू उलगडणाऱ्या विविध कवींच्या अनुवादित /भावानुवादित कविता या सदरातून वाचायला मिळतील.)

Web Title: govind prasad's poem

फोटो गॅलरी