नोटाबंदीची हाफ सेंच्युरी : निर्णयाचे बाऊन्सवर बाऊन्सर..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

8 नोव्हेंबर

 • 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द होणार. सध्या असलेल्या 500-1000 च्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बॅंकेत जमा करण्याची मुदत असेल. पुढील दोन दिवस बॅंका व्यवहारासाठी बंद ठेवणार. 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी एटीएमही बंद राहणार.
 • एकावेळी बॅंकेतून चार हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळणार. एका आठवड्यात तुमच्या खात्यातून 20 हजार रुपयेच काढता येणार. एटीएममधून रोज दोन हजार रुपयेच काढता येणार.

9 नोव्हेंबर

8 नोव्हेंबर

 • 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द होणार. सध्या असलेल्या 500-1000 च्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बॅंकेत जमा करण्याची मुदत असेल. पुढील दोन दिवस बॅंका व्यवहारासाठी बंद ठेवणार. 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी एटीएमही बंद राहणार.
 • एकावेळी बॅंकेतून चार हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळणार. एका आठवड्यात तुमच्या खात्यातून 20 हजार रुपयेच काढता येणार. एटीएममधून रोज दोन हजार रुपयेच काढता येणार.

9 नोव्हेंबर

 • बॅंकांसाठी रिझर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.
 • 100 रुपयांच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध होतील, याची काळजी घेण्याची रिझर्व्ह बॅंकेची सूचना.

10 नोव्हेंबर

 • 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी इलेक्‍ट्रॉनिक ट्रान्सफरची सुविधा चालू राहणार

11 नोव्हेंबर

 • जुन्या नोटा बदली करतानाच्या सर्व नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला देण्याच्या सर्व बॅंकांना सूचना.
 • लेखी मागणी केल्यानंतर आणि बॅंकेच्या अधिकाऱ्याच्या निर्णयानुसार एका वेळी बॅंकेतून 10 हजार रुपये काढण्याची परवानगी.

12 नोव्हेंबर

 • रोखीव्यतिरिक्त इतर पर्याय वापरण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे आवाहन

13 नोव्हेंबर

 • जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा चार हजारांवरून 4,500 केली. एटीएममध्ये 2,500 आणि आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार
 • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बॅंकेत स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना.

14 नोव्हेंबर

 • 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीतील एटीएम व्यवहारांवरील शुल्क रद्द करण्याची सूचना.
 • करंट अकाऊंट असलेल्या खातेदारांना एका आठवड्यात 50 हजार रुपये काढण्याची मुभा.
 • बॅंकेचे जाळे नसलेल्या भागांत जुन्या नोटा बदलून देणे, पैसे भरणे आणि पैसे काढण्यासाठी मोबाईल व्हॅनची सोय करण्याची सूचना

15 नोव्हेंबर

 • बॅंकेत जुन्या नोटा भरल्या, की ग्राहकाच्या बोटाला शाई लावण्याचा आदेश.

16 नोव्हेंबर

 • बॅंकेच्या खात्यास 'पॅन' जोडला नसेल आणि त्या खात्यात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली जात असेल, तर त्या खातेदाराचा 'पॅन' घेण्याच्या सूचना.

17 नोव्हेंबर

 • बॅंकेत जुन्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा दोन हजार रुपये केली.

20 नोव्हेंबर

 • एटीएममधून एकावेळी 2,500 रुपये काढण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास नकार.

21 नोव्हेंबर

 • शेतकऱ्यांना एका आठवड्यात 25 हजार रुपये काढण्याची मुभा

23 नोव्हेंबर

 • अल्प मुदतीच्या बचत योजनांमध्ये जुन्या नोटा न स्वीकारण्याची सूचना.

24 नोव्हेंबर

 • बॅंकांमधून जुन्या नोटा बदलून घेण्याची सुविधा बंद.

25 नोव्हेंबर

 • भारतात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांना एका आठवड्यात पाच हजार रुपये काढण्याची परवानगी.

30 नोव्हेंबर

 • जन-धन योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांमधून दरमहा 10 हजार रुपये काढण्याची मर्यादा.

12 डिसेंबर

 • बॅंकेत जमा झालेल्या जुन्या नोटांमधून आलेल्या बनावट नोटांची माहिती देण्याच्या सूचना.
 • 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीतील प्रत्येक बॅंकेच्या प्रत्येक शाखेनुसार जमा झालेल्या बनावट नोटांचीही माहिती देण्याच्या सूचना.

13 डिसेंबर

 • बॅंक आणि करन्सी चेस्टमधील सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याच्या बॅंकांना सूचना.

15 डिसेंबर

 • एखाद्या खात्यात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक शिल्लक असेल आणि 9 नोव्हेंबरनंतर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असेल, तर त्या खात्यातील रक्कम काढण्यावर मर्यादा.

17 डिसेंबर

 • डेबिट कार्डाद्वारे दिलेल्या रक्कमेवर 'मर्चंट डिस्काऊंट रेट' रद्द करण्याचा निर्णय.
 • मोबाईल फोन आणि इंटरनेटद्वारे छोट्या रकमेच्या व्यवहारांवर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत अतिरिक्त चार्ज नाही.

19 डिसेंबर

 • जुन्या नोटांद्वारे पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात भरण्यावर मर्यादा. ही रक्कम 31 डिसेंबरपर्यंतच खात्यात भरता येणार.

21 डिसेंबर :

 • जुन्या नोटांद्वारे पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात भरण्यावर असलेली मर्यादा काढून टाकली.

 

Web Title: Half centuary of demonetisation : Decision bouncer