पूरग्रस्त भामरागड तालुक्याला मदतीचा हात...!

दिपक चटप
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सर्व मूलभूत गरजांसाठी गेल्या 2 महिन्यांपासून हा तालुका संघर्ष करत आहे. कोणताही मंत्री जरी मदतीला तिथे पोहचला नसला तरी स्थानिक जिल्हाधिकारी, तहसीलदार, पीएसआय तिथे युद्धपातळीवर काम करताना दिसले. हा भाग आदिवासी बहुल असून, बहुसंख्य घर मातीची असल्याने जमीनदोस्त झाली. 

गेल्या काही दिवसांपासून पूरग्रस्त भामरागड तालुक्यात होतो. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या या भागात तब्बल 110 गावांतील 25000 लोकांना पुराचा फटका बसला. आम्ही जमा केलेले जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन दिले. भामरागडचे तहसीलदार कैलास अंडीले सर, नायब तहसीलदार सोनावने सर, पी.एस.आय शिंदे सर, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक हे देखील आमच्यासोबत सहभागी झाले. 

सोमनपल्ली गावात जाण्यासाठी आम्हाला 3 किलोमीटर जंगलातून पायदळ जावे लागले. तिथे 50 लोक पुरामुळे बेघर झाली आहेत. कोठी या गावातील पोलिस ठाणे एक दिवस संपूर्ण पाण्याखाली असल्याने तेथील सर्व पोलिस रेकॉर्ड पाण्यात भिजले. किअर, कारमपल्ली या गावाची अवस्था बिकट आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सर्व मूलभूत गरजांसाठी गेल्या 2 महिन्यांपासून हा तालुका संघर्ष करत आहे. कोणताही मंत्री जरी मदतीला तिथे पोहचला नसला तरी स्थानिक जिल्हाधिकारी, तहसीलदार, पीएसआय तिथे युद्धपातळीवर काम करताना दिसले. हा भाग आदिवासी बहुल असून, बहुसंख्य घर मातीची असल्याने जमीनदोस्त झाली. 

1994 नंतर आलेला सर्वांत मोठा पूर असून, या पावसाळ्यात सातव्यांदा पूर आला आहे. दुर्लक्षित अशा भामरागड तालुक्यातील लोकांना पुन्हा सक्षमपणे उभे राहण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. गेल्या 4 महिन्यांपासून गरोदर महिलांचा पोषण आहार या भागात आला नाही. बऱ्याच शाळा-दवाखाने बंद दिसले. अनेकजण पुरात वाहून गेले.

लहान मुलांचे चेहरे बघवत नव्हते. माझा त्या भागातील अनुभव सविस्तर लिहिलाच. पण, सध्या प्रत्येकाने त्यांना शक्य तेवढी मदत करा. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping Hand to Bhamragad