उत्पादन इकोफ्रेंडली बॉडी स्क्रबचे!

Vandana-Kotwal
Vandana-Kotwal

घरच्या घरी - वंदना कोतवाल
निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने दोन्ही मी घेतले आहेत. पर्ल, सेमी प्रेशियस, स्टोन, अगेट पेंडण्ट, ब्रास पेंडण्ट असे अनेक प्रकार मी करते. पुण्यातील व मुंबईतील अनेक व्यावसायिक प्रदर्शने, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, काला घोडा फेस्टिव्हल व दुबईतील इंडिया क्लब येथेही निआ ज्वेलरीला भरघोस प्रतिसाद मिळाला. हटके आणि एलर्जी न होणारे म्हणून निआ ज्वेलरीची वेगळी ओळख आहे. भारतभर; तसेच यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील आप्तेष्टांना आवर्जून भेट देणारे अनेक उत्साही ग्राहकदेखील मला लाभले आहेत.

ज्वेलरीबरोबरच निआ क्रिएशन्सचे आयुर्वेदिक बॉडी स्क्रब याला खूप लोकप्रियता मिळत आहे. आज निसर्गाच्या समतोलाशी निगडित असलेल्या समस्या सर्वज्ञात आहेत. अशात निसर्गाची कुठल्याही प्रकारे हानी न करता रोजच्या वापरातून सगळ्या वयोगटांच्या त्वचेचे आरोग्य जपणारे आणि सौंदर्य खुलवणारे उत्पादन तयार करण्याच्या दृष्टीने हे बॉडी स्क्रब मी तयार केले. यामध्ये वाळा, आंबेहळद, सुगंधी कचोरा अशा दहा प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणाऱ्या, त्वचेच्या समस्या असलेल्या किंवा नसलेल्या, संवेदनशील त्वचा असलेल्या अशा सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे. याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता यावे, अशी माझी इच्छा आहे.

मेहनत, सचोटी, कौशल्य, उत्तम सादरीकरण, संवाद, कला, इतर उद्योजिकांना मदत व योग्य मार्गदर्शन करण्याची वृत्ती, वेळेचे व्यवस्थापन, जास्तीत जास्त वेळ माझ्या उद्योगासाठी देणे, दिलेली वेळ पाळणे आणि निर्मितींमध्ये काळागणिक नावीन्य आणत राहणे ही उद्योजिका म्हणून माझी मूल्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com