जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जून

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जून

आजचे दिनमान

मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. 

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 

मिथुन : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आजचा दिवस प्रगतीचा आहे. कर्तृत्त्वाला संधी लाभेल. 

कन्या : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कामाचा ताण जाणवणार आहे. 

तूळ : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. 

वृश्‍चिक : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

धनू : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवी मैत्री जुळून येईल. 

मकर : कॉन्ट्रॅक्‍टर्स या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. 

कुंभ : मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. साडी सेंटर्स, ज्वेलर्स व केटरर्स यांना विशेष यश मिळेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुयश लाभेल. 

पंचांग
शनिवार : वैशाख कृष्ण 13, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय पहाटे 4.17, चंद्रास्त सायंकाळी 5.18, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ 11, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com