जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पंचांग 1 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन शुद्ध 3, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 8.48, चंद्रास्त रात्री 8.45, भारतीय सौर आश्‍विन 9, शके 1941. 

दिनांक : 1 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : ग्रहमान बरेचसे प्रतिकूल आहे. वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

वृषभ : तुमचा वैचारिक प्रभाव पडणार आहे. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष कामगिरी करून दाखवतील. उत्साह वाढेल. 

मिथुन : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती होईल. गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. 

कर्क : तुमच्या जीवनात वैचारिक परिवर्तन होऊ शकते. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकता. सुसंधी, प्रसिद्धी लाभणार आहे. 

सिंह : तीर्थयात्रेचे, प्रवासाचे योग येतील. आर्थिक क्षेत्रात जेवढे धाडस करता येईल तेवढे करावे. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. धाडस, जिद्द वाढणार आहे. अडचणीवर मात कराल. 

तूळ : ग्रहमान खूपच प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कोणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

वृश्‍चिक : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमची सर्व कामे मार्गी लागणार आहेत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

धनू : परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विचारांचा प्रभाव पडेल. 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्हाला हवी ती संधी लाभणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 

कुंभ : आजचा दिवस प्रचंड प्रतिकूल आहे. हितशत्रुंचा त्रास होईल. प्रवास कटाक्षाने टाळावा. 

मीन : तुम्ही हाती घेतलेल्या कामात सफलता प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

पंचांग 1 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन शुद्ध 3, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 8.48, चंद्रास्त रात्री 8.45, भारतीय सौर आश्‍विन 9, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 1 October 2019