जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : 10 मे

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष :
प्रवास सुखकारक होतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेली कामे उत्साहाने पार पाडाल. 

मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. अनेक कामे मार्गी लागतील. 

कर्क : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होतील. महत्त्वाची व शुभ कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

कन्या : अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कामे मार्गी लागणार आहेत. 

तूळ : व्यवसायात मनासारखी वाढ होईल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. प्रवास सुखकर होतील. 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कामामध्ये चैतन्य येईल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. 

धनू : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. 

मकर : कलेच्या क्षेत्रात वेगळी उंची गाठू शकाल. मनोरंजनाकडे कल वाढेल. आपल्या आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. नवे स्नेहसंबंध जुळतील. आत्मविश्‍वासाच्या जोरावर अडचणीवर मात कराल. 

मीन : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात अत्यंत चांगले वातावरण राहणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

पंचांग
शुक्रवार : वैशाख शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.05, सूर्यास्त 7, चंद्रोदय सकाळी 10.38, चंद्रास्त रात्री 11.54, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख 20, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन । जलसंधारण दिन 

  • 1993 - जगातील सर्वोच्च 8448 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी भारताच्या तीन महिला सदस्यांच्या तुकडीने केली. त्यातील 23 वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसऱ्यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
  • 2001 - जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद करण्यासाठी "फिंगर प्रिंट' यंत्राचा उपयोग सुरु केला. पुण्यात शासकीय व निमशासकीय स्तरावर प्रथमच हा प्रयोग झाला. 
  • 2001 - जमिनीवरुन आकाशातील लक्ष्यावर मारा करणाऱ्या "ओसा" या रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी चंडीपूर तळावर यशस्वीपणे घेण्यात आली. या चाचणीसाठी वैमानिकरहित विमानाचा वापर करण्यात आला. संगणक बसविलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला बारा किलोमीटर इतका आहे.
  • 2015 - चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा "दादासाहेब फाळके पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री किरण जेटली यांच्या हस्ते प्रदान. सुवर्णकमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

सुविचार 
नाते आणि विश्‍वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. कारण जिथे विश्‍वास असतो, तिथे नाते आपोआप बनत जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com