जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 नोव्हेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 नोव्हेंबर

दिनांक : 11 नोव्हेबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 

वृषभ : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 

मिथुन : आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. 

कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्‍तिमत्त्वाचा दबदबा राहील. 

सिंह : महत्त्वाची कामे पूर्ण कराल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवासाचे योग येतील. 

कन्या : प्रतिकूलता जाणवेल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. 

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. काहींना अनावश्‍यक मनस्ताप संभवतो. खर्च वाढणार आहेत. 

धनू : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणी भेटतील. 

मकर : सकारात्मकपणे व आशावादीपणे कार्यरत रहाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल. 

कुंभ : चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाल. 

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

पंचांग 11 नोव्हेंबर 2019 
सोमवार : कार्तिक शुद्ध 14, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय सायंकाळी 5.21, चंद्रास्त पहाटे 5.27, वैकुंठ चतुर्दशी, भारतीय सौर कार्तिक 20, शके 1941 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com