जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 ऑक्टोबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 ऑक्टोबर

दिनांक : 11 ऑक्‍टोबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 

मेष : नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. विविध लाभ होतील. 

वृषभ : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

मिथुन : काहींना गुरूकृपा लाभेल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल. 

कर्क : आज आपणाला प्रतिकूलता जाणवणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. 

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण होतील. अनुकूलता लाभेल. प्रवास होतील. 

कन्या : प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको. आर्थिकबाबतीत सावधानता हवी. 

तूळ : प्रियजनांसाठी वेळ द्याल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील. 

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. तुम्हाला मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : जिद्दीने कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल. 

मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. 

कुंभ : तुमचा प्रभाव राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. अनेक कामे मार्गी लावू शकाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. 

मीन : काहींना निरुत्साहीपणा जाणवेल. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी. 

पंचांग 11 ऑक्‍टोबर 2019 
शुक्रवार : आश्‍विन शुद्ध 13, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.15, चंद्रोदय सायंकाळी 5, चंद्रास्त पहाटे 4.19, प्रदोष, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन वेडूक, भारतीय सौर आश्‍विन 19, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com