जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जून

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष : मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. शत्रुपीडा नाही. सार्वजनिक क्षेत्रात संधी लाभेल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : प्रवासात सावधगिरी हवी. मनोरंजनावर अधिक खर्च होईल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

कर्क : आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरतील. राजकीय क्षेत्रात यश लाभेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. 

सिंह : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. काहींना अधिकारपद लाभेल. 

कन्या : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. काहींना प्रवासाचे योग येतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. 

तूळ : महत्त्वाचे निर्णय नकोत. शारीरिक इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. एखादी मानसिक अस्वस्थता राहील. 

वृश्‍चिक : अनेकांशी सुसंवाद साधाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. 

धनू : ताण वाढणार आहे. मनोबल वाढेल. अडचणीवर मात कराल. मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. 

मकर : नवी दिशा सापडेल. विद्यार्थ्यांना यश लाभणार आहे. शत्रुपीडा नाही. काहींना मित्रांसाठी खर्च करावा लागेल. 

कुंभ : मानसिक चिंता राहील. हितशत्रूंचा त्रास जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मीन : आत्मविश्‍वास वाढेल. योग्य मार्गदर्शन लाभेल. अडचणी राहणार आहेत; परंतु त्यातून आपण मार्ग काढू शकाल. 

पंचांग
बुधवार : ज्येष्ठ शुद्ध 10, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय दुपारी 2.33, चंद्रास्त रात्री 2.09, दशहरा समाप्ती, भारतीय सौर ज्येष्ठ 22, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com