जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 नोव्हेंबर

bhavishya
bhavishya

दिनमान 12 नोव्हेबर 2019 : वार : मंगळवार 

मेष : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृषभ : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. 

मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

कर्क : सार्वजनिक कार्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हाल. उमेदीने कार्यरत रहाल. अनेक कामात सुयश लाभेल. 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. 

कन्या : नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

तूळ : उत्साह व उमेद वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मित्रांची मदत मिळेल. 

वृश्‍चिक : प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. व्यवसायात चढ-उतार जाणवतील. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

धनू : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. शासकीय कामात यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कुंभ : ग्रहमान खूप अनुकूल आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. 

पंचांग 12 नोव्हेंबर 2019 
मंगळवार : कार्तिक शुद्ध 15, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.42, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय सायंकाळी 5.59, चंद्रास्त सकाळी 6.18, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक स्नान समाप्ती, तुलसी विवाह समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 21, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com