जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पंचांग 12 सप्टेंबर 2019 
गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941.

आजचे दिनमान 
मेष : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील. 

वृषभ : अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक प्रगती होईल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील. 

कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामाचे नेतृत्व आपल्याकडे येईल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कन्या : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे मनासारखे सहकार्य लाभणार आहे. वस्तू हरविणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यावे. 

तूळ : प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

वृश्‍चिक : आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. केलेले करारमदार लाभदायक ठरतील. 

धनू : एखादी गोष्ट मनासारखी होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले स्वास्थ्य लाभेल. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कुंभ : आरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. 

मीन : महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रवासाचे बेत शक्‍यतो टाळावेत. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यात यशस्वी व्हाल. 

पंचांग 12 सप्टेंबर 2019 
गुरुवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सायंकाळी 5.45, चंद्रास्त पहाटे 4.44, अनंत चतुर्दशी, भारतीय सौर भाद्रपद 21, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 12 September 2019