जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पंचांग 13 फेब्रुवारी 2020 
गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941. 

दिनांक : 13 फेब्रुवारी 2020 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. 

वृषभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जुन्या मित्रमैत्रिणी भेटतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूलता लाभणार आहे. 

मिथुन : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे. 

कर्क : मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. 

सिंह : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. 

कन्या : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे. 

तूळ : तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत. प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी. 

वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात करू शकणार आहात. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत. 

धनू : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. 

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवाद टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल. 

मीन : तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. 

पंचांग 13 फेब्रुवारी 2020 
गुरुवार : माघ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 7.06, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.49, चंद्रास्त सकाळी 10.17, भारतीय सौर माघ 24, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 13 February 2020