जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पंचांग 13 जानेवारी 2020 
सोमवार : पौष कृष्ण 3, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.16, चंद्रोदय रात्री 8.58, चंद्रास्त सकाळी 9.23, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष 23, शके 1941. 

दिनमान 13 जानेवारी 2020 
मेष : कामे मार्गी लागतील. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. नवी दिशा सापडेल. 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मानसिक उत्साह वाढेल. 

मिथुन : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात काही चांगले बदल करू शकता. 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात मनासारखे वातावरण राहील. 

सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात वातावरण प्रतिकूल आहे. कामाचा ताण जाणवेल, दगदग जाणवेल. 

तूळ : मानसिक उत्साह, उमेद वाढेल. व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात नावलौकिक लाभेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाचे योग येतील. 

धनू : काहींना प्रवासाचे योग येतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. मानसिक उत्साह वाढणार आहे. 

मकर : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. 

मीन : व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करण्याचा फायदा होणार आहे. तुमच्या नावलौकिकात भर होणार आहे. 

पंचांग 13 जानेवारी 2020 
सोमवार : पौष कृष्ण 3, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.16, चंद्रोदय रात्री 8.58, चंद्रास्त सकाळी 9.23, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष 23, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 13 January 2020