जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 सप्टेंबर

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : रिअल इस्टेट, प्रॉपर्टीच्या कामामध्ये अनुकूलता राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

वृषभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात वातावरण चांगले राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकारक होणार आहेत. 

कर्क : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. 

सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कन्या : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. वाहने चालवताना काळजी हवी. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

तूळ : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 

वृश्‍चिक : व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणावर होईल. नोकरीतील व्यक्‍तींवर एखादी चांगली जबाबदारी सोपवली जाईल. 

धनू : परिश्रमांची शर्थ करून यश खेचून आणाल. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

कुंभ : जिद्दीने व धाडसाने हाती घेतलेली कामे पूर्णत्वाला जातील. यश मिळणार आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक श्रम करावे लागतील. व्यवसायात धोका पत्करू नका. 

पंचांग 13 सप्टेंबर 2019 
शुक्रवार : भाद्रपद शुद्ध 14, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय सायंकाळी 6.23, चंद्रास्त पहाटे 5.34, प्रोष्ठपदी पौर्णिमा, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन मोर, भारतीय सौर भाद्रपद 22, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com