जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 मे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 मे

आजचे दिनमान 
मेष :
व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तडजोडीचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. 

वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. अपेक्षित कामे होणार आहेत. 

कर्क : कर्तृत्वाला संधी लाभणार आहे. विशेष कामगिरी सोपवली जाईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळेल. 

कन्या : कोणावरही विसंबून राहू नका. कामाचा ताण वाढेल. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. 

तूळ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरणार आहेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

वृश्‍चिक : मित्रांच्याकडून आश्‍वासनपूर्ती होणार नाही. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. उसनवारी किंवा जामीन व्यवहार टाळावेत. 

धनू : साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 

मकर : प्रवासाचे योग पुढे ढकलावेत. मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. हाती घेतलेल्या कामात अडचणी जाणवतील. 

कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हवी असलेली संधी मिळणार आहे. उत्साहाने कामे पार पाडाल. 

मीन : शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना आर्थिक लाभ. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभ. 

पंचांग
मंगळवार : वैशाख शुद्ध 10, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.03, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय दुपारी 2.42, चंद्रास्त रात्री 2.44, भारतीय सौर वैशाख 24, शके 1941.

दिनविशेष 
जागतिक रक्तदान दिन 

  • 2000 - जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या नौदलासाठीच्या "त्रिशूल' क्षेपणास्त्राची भारताची यशस्वी चाचणी. 
  • 2015 - काबूल येथील प्रसिद्ध कोलोला पुश्‍ता भागातील "पार्क पॅलेस' गेस्ट हाउसवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये चौदा जण ठार झाले. मृतांमध्ये चार भारतीय आणि एका अमेरिकी नागरिकाचा समावेश आहे. भारताचे राजदूत अमर सिन्हाच या दहशतवाद्यांचे टार्गेट होते. 
  • 2017 - इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे 25 वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले. 
  • 2018 - इस्राईलच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 14 May 2019