जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पंचांग 14 सप्टेंबर 2019 
शनिवार : भाद्रपद शुद्ध 15, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय सायंकाळी 6.59, चंद्रास्त सकाळी 6.22, महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध, भागवत सप्ताह समाप्ती, भारतीय सौर भाद्रपद 23, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. त्यांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेक कामे हातावेगळी करू शकाल. 

मिथुन : शासकीय कामे शक्‍यतो लवकर उरकून घ्यावीत. काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसायाच्या दृष्टीने सध्याचे ग्रहमान अत्यंत यश देणारे आहे. 

कर्क : कलेच्या क्षेत्रात नवी दिशा सापडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

सिंह : आर्थिक आवक चांगली असणार आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. आर्थिक क्षेत्रात धाडसाने घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत. 

कन्या : आरोग्य चांगले राहील. मात्र, इतर अनेक गोष्टीत दिवस प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

तूळ : दोन दिवसांत शासकीय कामे उरकून घ्यावीत. आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार नाहीत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. 

वृश्‍चिक : सर्व क्षेत्रात तुम्हाला अनुकूलता लाभणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. 

धनू : साडेसातीची तीव्रता कमी होत आहे. व्यवसाय वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

मकर : भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. जवळच्या सहकाऱ्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. 

कुंभ : बौद्धिक जीवनात मानसिक परिवर्तनाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मीन : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. अनपेक्षितरित्या खर्च वाढणार आहेत. मानसिक ताणतणाव निर्माण होतील. 

पंचांग 14 सप्टेंबर 2019 
शनिवार : भाद्रपद शुद्ध 15, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय सायंकाळी 6.59, चंद्रास्त सकाळी 6.22, महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध, भागवत सप्ताह समाप्ती, भारतीय सौर भाद्रपद 23, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 14 September 2019