जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

मेष : सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ : जिद्द, व चिकाटी यामुळे संधीचे सोने करू शकाल. सामाजिक व सार्वजनिक जीवनाकडे ओढा राहील. मनोरंजनाकडे कल वाढेल.

आजचे दिनमान
मेष : सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ : जिद्द, व चिकाटी यामुळे संधीचे सोने करू शकाल. सामाजिक व सार्वजनिक जीवनाकडे ओढा राहील. मनोरंजनाकडे कल वाढेल.
मिथुन : थोरामोठ्यांचे परिचय होतील. आर्थिक आवक अपेक्षेपेक्षा अधिक राहणार आहे. प्रवासाचे योग येतील.
कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. उत्साह, उमेदीने दिवसभर कार्यरत राहाल.
सिंह : थोरामोठ्यांकडून, वरिष्ठांकडून अपेक्षा करू नका. कामाचा ताण व दगदग वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
कन्या : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सर्व क्षेत्रांत तुमची आगेकूच चालू राहणार आहे. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सर्व मिळणार आहे.
तूळ : मानमान्यता लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल.
वृश्‍चिक : सामाजिक, राजकीय कार्यात एखादी संधी लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल.
धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांकडून थोडी मदत मिळेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मकर : अनेक कामे सहजपणे पार पडणार आहेत. अपेक्षित फोन व गाठीभेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे.
कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. योग्य कामासाठी खर्च कराल. आपण काही चुकीचे करत नाही ना याचे चिंतन करावे.
मीन : अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमचे अनुभवाचे क्षेत्र व्यापक होणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

पंचांग 
गुरुवार : श्रावण शुद्ध 15, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.02, चंद्रोदय सायंकाळी 7.06, चंद्रास्त पहाटे 5.57, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, शुक्‍लयजुः तैत्तिरीय श्रावणी, भारतीय सौर श्रावण 24, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 15 August 2019