जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 जून

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीची व शुभ कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अनपेक्षित धनलाभाची शक्‍यता आहे. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च योग्य कामासाठी होतील. 

कर्क : संपूर्ण दिवस समाधानकारक आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य चांगले राहील. 

सिंह : प्रवास विशेष सुखकारक होतील. अनेक कामे सुरळीतपणे व व्यवस्थित मार्गी लागतील. सार्वजनिक कार्यात तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा ठसा उमटवू शकाल. 

कन्या : मानसिक उत्साह वाढणार आहे. नातेवाईकांचे, मित्रांचे सहकार्य लाभेल. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

तूळ : अपेक्षेपेक्षा आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. कौटुंबिक जीवनात विशेष आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत थोरामोठ्यांचे विशेष सहकार्य लाभेल. 

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च कराल. 

मकर : आर्थिक लाभ विशेष होतील. विद्यार्थ्यांना विलक्षण यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. 

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. व्यवसायात उच्चांकी यश मिळेल. तुमचा करिष्मा चालणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

पंचांग
शनिवार ः ज्येष्ठ शुद्ध 13, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय सायंकाळी 5.23, चंद्रास्त पहाटे 4.17, शिवराज्याभिषेकोत्सव दिन, भारतीय सौर ज्येष्ठ 25, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com