जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 मे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 मे

आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामात यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. अपेक्षित कामे वेळेवर होणार नाहीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. 

कर्क : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. कामाचा ताण जाणवणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कन्या : जबाबदारी वाढणार आहे. प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

तूळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात अडचणी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील. 

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

धनू : व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. साडेसातीची तीव्रता जाणवेल. व्यवसायात फार मोठे धाडस टाळावे. 

मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामात यश लाभेल. 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात धाडस कटाक्षाने टाळावे. मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्‍यता आहे. एखाद्या कामाबद्दल चिंता राहणार आहे. 

मीन : महत्त्वाचे निर्णय टाळावेत. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

पंचांग
बुधवार : वैशाख शुद्ध 11, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.03, सूर्यास्त 7.02, चंद्रोदय दुपारी 3.40, चंद्रास्त पहाटे 3.26, मोहिनी एकादशी, भारतीय सौर वैशाख 25, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक कुटुंब दिन 

  • 1995 - जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर प्राणवायू व इतर साधनांविना एकटीने चढाई करण्याचा बहुमान ऍलिसन हारग्रिव्हज या ब्रिटिश महिलेने संपादिला. 
  • 2003 - सरदार सरोवर धरणाची उंची शंभर मीटरपर्यंत वाढविण्याच्या कामास प्रारंभ. 
  • 2007 - ब्रिटिशकालीन प्रशासन व्यवस्थेत शेवटचे "आयसीएस' अधिकारी म्हणून काम केलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी रा. कृ. पाटील यांना 2007 च्या राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर. 
  • 2015 - राज्यातील पतसंस्थांनी विमा संरक्षण नसल्याचे स्पष्टीकरण ठेवीदारांच्या पासबुकात व ठेव पावतीवर लेखी नोंदवावे, तसेच त्यासह संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा तपशीलही कार्यालयात फलकावर जाहीर करावा, असा आदेश सहकार आयुक्तांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 15 May 2019