जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीच्या प्रश्‍नाकडे विशेष लक्ष द्याल. काहींना प्रवासाचे योग येण्याची शक्‍यता आहे. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

वृषभ : गुंतवणुकीसाठी व प्रॉपर्टीसाठी आजचा दिवस विशेष शुभ आहे. कर्तृत्वाला संधी मिळेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. आर्थिक क्षेत्रात नवीन संधी लाभेल. 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसाय वाढेल. मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष लाभ होतील. 

सिंह : अडचणी कमी होऊन उत्साह वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. 

कन्या : मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीसाठी व कोणत्याही शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात तुम्ही अपेक्षित उंची गाठू शकाल. 

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. स्त्रियांच्या संदर्भातील व्यवसायात विशेष लाभ होतील. साडेसातीची तीव्रता कमी होईल. 

मकर : मनोरंजनावर खर्च वाढेल. आपण एखाद्या चुकीच्या व्यक्‍तीच्या भावनेत गुंतत नाही ना याची दक्षता घ्यावी. 

कुंभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला व शुभ कामाला आपणाला दिवस चांगला आहे. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. काहींना हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. 

पंचांग 16 ऑगस्ट 2019 
शुक्रवार : श्रावण कृष्ण 1, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.02, चंद्रोदय सायंकाळी 7.45, चंद्रास्त सकाळी 6.48, भारतीय सौर श्रावण 25, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com