जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 जुलै

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 

वृषभ : नोकरीमधील निर्णय उच्चपदस्थांना विचारल्याशिवाय घेऊ नये. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. वादविवादामध्ये सहभाग टाळावा. 

मिथुन : भागीदारी व्यवसायातील कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात कटकटी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

कर्क : खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्यास निराश होऊ नये. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 

सिंह : आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणालाही उसनवार पैसे देऊ नये. मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. आरोग्य चांगले राहील. काहींना गुरूकृपा लाभेल. 

तूळ : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. सुसंधी लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी. 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहने सावकाश चालवावीत. 

धनू : स्वत:कडे लक्ष देणे गरजेचे भासेल. जीवनातील समस्या वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मन ध्यानमध्ये रमेल. 

मकर : विरोधकावर मात कराल. दवाखान्याला भेट द्यावी लागेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय पुढे ढकलावेत. 

कुंभ : मुलामुलींबरोबर संभाषण साधण्याचा करावा. अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी पडतील. 

मीन : कामे सुरळीत चालू आहेत याचा आढावा घ्यावा. मनोरंजनाच्या क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

पंचांग
मंगळवार : आषाढ शुद्ध 15, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.08, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय सायंकाळी 6.52, चंद्रास्त पहाटे 5.25, गुरुपौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण, व्यासपूजा, ग्रहणदिन, भारतीय सौर आषाढ 25, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com