जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पंचांग 16 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद कृष्ण 2, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.37, चंद्रोदय रात्री 8.08, चंद्रास्त सकाळी 7.58, द्वितीया श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 25, शके 1941. 

राहूचा अशुभ काळ : सकाळी 7.30 ते 9.00 
आजचे दिनमान 

मेष : धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. बौद्धिक क्षेत्रात तुमच्या कामगिरीची नोंद होईल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

वृषभ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. ग्रहांची साथ लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. 

कर्क : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. ग्रह खूप अनुकूल आहेत. तुम्ही अधिक परिश्रम कराल. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस करू नका. वाहने चालवताना काळजी हवी. 

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. मानसिक स्थिती उत्तम राहणार आहे. नवीन दिशा सापडेल. 

तूळ : शासकीय कामे उरकून घ्यावीत. मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्थिती कमकुवत राहणार आहे. 

वृश्‍चिक : महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. तुम्हाला चांगले यश लाभणार आहे. हितसंबंध निर्माण करू शकाल. 

धनू : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश संपादन करू शकाल. 

मकर : एखादी चांगली घटना घडेल. नवीन संधी मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. 

कुंभ : प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. शासकीय कामे आजच उरकून घ्यावीत. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. 

मीन : तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. सर्व क्षेत्रात चांगली संधी लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

पंचांग 16 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद कृष्ण 2, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.37, चंद्रोदय रात्री 8.08, चंद्रास्त सकाळी 7.58, द्वितीया श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 25, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 16 September 2019