esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 जुलै

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 जुलै

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : जागेचे प्रश्‍न सोडवू शकाल. तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. कटकटी काही प्रमाणात कमी होतील. 

वृषभ : प्रतिष्ठा लाभणार आहे. शासकीय कामे आता मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. 

मिथुन : शासकीय कामे हळूहळू मार्गी लागतील. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. वादविवादापासून अलिप्त रहावे. 

कर्क : वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह : काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कोणतीही कामे करण्यापूर्वी सतर्क रहावे. 

कन्या : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. उच्च पद मिळण्याची शक्‍यता आहे. बढती मिळण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. जिद्द व चिकाटीच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. 

वृश्‍चिक : नवीन हितसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचेसहकार्य व मार्गदर्शन लाभेल. अडचणींवर मात करून पुढे याल. 

धनू : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. मुलामुलींच्या संदर्भातील काही निर्णय रखडण्याची शक्‍यता आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

मकर : मानसिक अस्वास्थ्य कमी होईल. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. सहकार्य लाभेल व कामे मार्गी लागतील. 

कुंभ : मन पूजाअर्चा, ध्यानधारणा यामध्ये रमेल. धार्मिक क्षेत्रात यश लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

मीन : विचारांचा इतरांवर प्रभाव पडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 

पंचांग
बुधवार : आषाढ कृष्ण 1, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.08, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय सायंकाळी 7.40, चंद्रास्त सकाळी 6.19, ग्रहण करिदिन, भारतीय सौर आषाढ 26, शके 1941.

loading image