जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 मे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 मे

आजचे दिनमान 
मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. 

वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुम्ही आखलेली कामे पार पडणार आहेत. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना अधिकारप्राप्तीचे योग आहेत. 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवीन परिचय होतील. अनेक कामे हातावेगळी करू शकाल. 

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात अनपेक्षितपणे एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

मकर : कर्तृत्त्वाल संधी मिळणार आहे. नोकरीत समाधानकार स्थिती राहील. विरोधकावर मात कराल. 

कुंभ : तुम्हाला योग्य दिशा सापडणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

पंचांग
शुक्रवार : वैशाख शुद्ध 14, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.02, चंद्रोदय सायंकाळी 5.36, चंद्रास्त पहाटे 4.55, श्रीनृसिंह जयंती, भारतीय सौर वैशाख 27, शके 1941. 

दिनविशेष 
जागतिक दूरसंचार दिन 

  • 2002 : तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी वांगचुक याच्यासह 54 गिर्यारोहकांनी एकाच दिवशी "माऊंट एव्हरेस्ट' या सर्वोच्च शिखरावर चढाई करीत विक्रम नोंदविला. एकाच दिवशी 54 गिर्यारोहकांनी या शिखरावर चढाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
  • 2005 : कुवेतमध्ये महिलांना मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. कुवेती संसदेने 35 विरुद्ध 23 अशा मतांनी महिलांना मतदानाचा अधिकार देणारे विधेयक मंजूर केले. 
  • 2006 : पश्‍चिम इराकमध्ये 15 तायक्वांदोपटूंचे अपहरण; महिन्यानंतर 13 जणांचे मृतदेह सापडले 
  • 2015 : मंगोलियामध्ये आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी त्यांना एक अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय मंगोलियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. मंगोलियाचे पंतप्रधान शिमेद सैखानबिलेग यांच्याबरोबर 14 करारांवर सह्या करण्यात आल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 17 May 2019