जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 ऑक्टोबर

bhavishya
bhavishya

दिनांक : 17 ऑक्‍टोबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाणार आहात. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. 

वृषभ : गेले दोन दिवस असणारी प्रतिकूलता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. 

मिथुन : काहींना निरुत्साहीपणा राहील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. 

कर्क : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 

सिंह : दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. 

कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अडलेली कामे पूर्ण कराल. प्रवास होतील. 

तुळ : मानसिक अस्वस्थता राहील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. 

वृश्‍चिक : तुमचे मनोबल उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण कमी होईल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपेल. 

धनू : मनोबल वाढेल. कामाचा ताण दगदग जाणवेल. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. 

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. 

कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन अत्यंत आनंदी राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. 

मीन : नातेवाईक भेटतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. 

पंचांग 17 ऑक्‍टोबर 2019 
गुरुवार : आश्‍विन कृष्ण 3, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.31, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय रात्री 8.44, चंद्रास्त सकाळी 9.17, संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी, भारतीय सौर आश्‍विन 25, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com