जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पंचांग 17 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद कृष्ण 3, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.36, चंद्रोदय रात्री 8.44, चंद्रास्त सकाळी 8.47, अंगारक चतुर्थी, तृतीया श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 26, शके 1941. 

दिनांक : 17 सप्टेंबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय आजच घेऊन टाका. 

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्य चांगले राहील. 

मिथुन : दिवस अनुकूल ठरणार आहे. अनेकांची मदत मिळेल, सहकार्य मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. धाडसाने निर्णय घ्याल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

सिंह : उत्साह, उमेद वाढेल. थोरामोठ्यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत. 

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काही जणांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

तूळ : प्रगती वेगाने होईल. आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. शासकीय कामे दुपारी 1 पर्यंत उरकून घ्यावीत. 

वृश्‍चिक : उत्साह कमी राहणार आहे. आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांची मदत मिळेल. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. व्यवसायात उलाढाल वाढेल. 

मकर : प्रवास सुखकारक होणार आहेत. सध्या प्रत्येक कामात यश मिळणे, संधी लाभणे अशी स्थिती आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

कुंभ : सध्या कोणत्याही क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. मात्र, मनोबल, उत्साह वाढेल. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात यश लाभणार आहे. मुलामुलींची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

पंचांग 17 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद कृष्ण 3, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.36, चंद्रोदय रात्री 8.44, चंद्रास्त सकाळी 8.47, अंगारक चतुर्थी, तृतीया श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 26, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 17 September 2019