जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 जून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

पंचांग 17 जून 2019 
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध 15, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय सायंकाळी 7.15, चंद्रास्त पहाटे 5.50, भारतीय सौर ज्येष्ठ 27, शके 1941.

आजचे दिनमान 
मेष : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीच्या संदर्भातील अडचणी कमी होतील. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल. 

वृषभ : प्रवास कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहारात धाडस नको. एखादी मनसिक चिंता राहील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. परिस्थिती संघर्षमय आहे. 

कर्क : आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. प्रवासात वस्तू हरविण्याची शक्‍यता आहे. वाहने चालवताना विशेष जबाबदारी घेणे योग्य ठरेल. 

सिंह : मुलामुलींच्याकरिता खर्च करावा लागेल. बौद्धिक कार्यक्षेत्रात यश लाभेल. अनेकांशी परिचय होतील. 

कन्या : अनेकांचे सहकार्य मिळेल. कामाचा ताण जाणवेल. आर्थिक क्षेत्रात नवनवीन संधी प्राप्त होतील. 

तूळ : मनोबल वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल. तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत. 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा यश मिळेल. प्रकृती बिघडणार नाही याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. वरिष्ठांची, मित्रांची मदत मिळणार नाही. 

धनू : उत्साह, उमेद वाढेल. अडचणीशी चिकाटीने सामना कराल. व्यवसायाकडे लक्ष द्याल. 

मकर : मानसिक ताण जाणवतील. एखादी घटना अचानकपणे मनाविरुद्ध घडणार आहे. प्रवास कटाक्षाने टाळावेत. 

कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी नोंदवू शकाल. 

मीन : तुमचा विचारांचा प्रभाव पडणार आहे. निर्धाराने व निश्‍चयाने पावले टाकाल. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

पंचांग 17 जून 2019 
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध 15, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय सायंकाळी 7.15, चंद्रास्त पहाटे 5.50, भारतीय सौर ज्येष्ठ 27, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 17th June 2019