जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 जुलै

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 जुलै

आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. अनपेक्षितरीत्या प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भातील काही प्रस्ताव समोर येतील. 

वृषभ : जिद्द व चिकाटीच्या जोरावर महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवाल. नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या कामाचे चीज होईल. 

मिथुन : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. लांबचे प्रवास टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. 

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची शासकीय कामे मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नको त्या कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. 

कन्या : संततिसौख्य लाभेल. मुलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

तूळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष राहील. आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

वृश्‍चिक : महत्त्वाची शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. घरात चैतन्यमय वातावरण राहील. 

धनू : वैवाहिक जीवनात कटकटी वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वादविवादाने कोणतेही प्रश्‍न सुटणार नाहीत. काहींना कामाचा ताण जाणवेल. 

मकर : विरोधकावर मात कराल. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक वातावरण राहणार आहे. 

कुंभ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. नातेवाइकांसाठी खर्च कराल. 

मीन : अडचणीवर मात करण्यासाठी मानसिक स्थिती मजबूत राहील. परंतु व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. 

पंचांग
गुरुवार : आषाढ कृष्ण 2, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.09, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय रात्री 8.25, चंद्रास्त सकाळी 7.10, भारतीय सौर आषाढ 27, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 18 July 2019