जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 नोव्हेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 नोव्हेंबर

दिनमान 18 नोव्हेबर 2019 

मेष : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहील. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. 

सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल. 

कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

तूळ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत अत्यंत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांची साथ चांगली लाभणार आहे. 

वृश्‍चिक : अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. वैवाहिक सौख्य लाभेल. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

धनू : शासकीय कामे पुढे ढकलावीत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. कलाकारांना विशेष प्रसिद्धी मिळेल. ट्रान्स्पोर्ट, कुरिअर व्यवसायातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील. 

पंचांग 18 नोव्हेंबर 2019 
सोमवार : कार्तिक कृष्ण 6, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.45, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय रात्री 11.12, चंद्रास्त सकाळी 11.51, भारतीय सौर कार्तिक 27, शके 1941 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com