जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 ऑक्टोबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 ऑक्टोबर

दिनांक : 18 ऑक्‍टोबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 

मेष : व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रियजनासाठी वेळ देवू शकाल. 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील. 

कर्क : प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

सिंह : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. चिकाटी वाढेल. 

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. प्रवासात अडचणी संभवतात. 

वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. 

धनू : अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. 

मकर : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील. 

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. 

पंचांग 18 ऑक्‍टोबर 2019 
शुक्रवार : आश्‍विन कृष्ण 4, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.10, चंद्रोदय रात्री 9.31, चंद्रास्त सकाळी 10.12, भारतीय सौर आश्‍विन 26, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com