जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पंचांग 18 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद कृष्ण 4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.35, चंद्रोदय रात्री 9.21, चंद्रास्त सकाळी 9.35, भरणी श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 27, शके 1941. 

दिनांक : 18 सप्टेंबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : मन:स्थिती चांगली राहिली तरी आता यश दूर राहणार आहे. फक्‍त आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. 

वृषभ : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील. लोकांचे सहकार्य चांगले मिळणार आहे. 

मिथुन : गुंतवणुकीला चांगले आहे. अनेकांची मदत मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

कर्क : प्रवासाचे योग येतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

सिंह : आर्थिक क्षेत्रात सध्या चांगले वातावरण आहे. या ग्रहस्थितीचा फायदा करून घ्यावा. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

कन्या : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनोबल वाढेल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. 

तूळ : महत्त्वाचे निर्णय घेताना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. फक्‍त आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. अकारण खर्च वाढतील. 

वृश्‍चिक : तुम्हाला ग्रहमान अनुकूल आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शेअर्समध्ये, व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

धनू : प्रगती वेगाने होत राहील. अनुकूल ग्रहांचा फायदा करून घ्यावा. व्यवसायात तुम्हाला लक्षणीय यश मिळणार आहे. 

मकर : सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात यश लाभेल. नवी दिशा, नवा मार्ग दिसेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. 

कुंभ : ग्रहमान प्रतिकूल झाले आहे. केवळ मनोबलाच्या जोरावर कामे कराल. सध्या कोणाचीही साथ लाभणार नाही. 

मीन : मीन व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. तुमचे निर्णय अचूक ठरतील. 

पंचांग 18 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद कृष्ण 4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.35, चंद्रोदय रात्री 9.21, चंद्रास्त सकाळी 9.35, भरणी श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 27, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 18 September 2019