bhavishya
bhavishya

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 ऑगस्ट

आजचे दिनमान 
मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील. मुलामुलींची कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत अत्यंत समाधानकारक स्थिती राहील. अनेक गोष्टीत यश खेचून आणाल. 

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शुभ कामासाठी दिवस अत्यंत चांगला आहे. तुम्हाला योग्य दिशा सापडणार आहे. 

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. 

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. प्रकृती सुधारेल. सतत खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. 

तूळ : व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. 

वृश्‍चिक :कोणत्याही शुभ कार्याकरिता दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढेल. 

धनू : शासकीय कामात यश लाभेल. कलाकारांना विशेष संधी लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

मकर : विवाहेच्छुंचे विवाह जमतील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. सतत चिंतन करून आपण चुकीचे काही करत नाही याचा विचार करत राहा. 

कुंभ : तुमचा प्रभाव वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. पायाला जखम होणार नाही याची दक्षता घ्यावी. नको त्या गोष्टीवर खर्च कराल. 

पंचांग 19 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण कृष्ण 4, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.19, सूर्यास्त 7, चंद्रोदय रात्री 9.32, चंद्रास्त सकाळी 9.13, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर श्रावण 28, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com