जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 जुलै

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपर्यंत उरकून घ्यावीत. जनसंपर्क वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील. 

वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने दुपारपर्यंतचा कालखंड चांगला आहे. दुपारनंतर व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 

मिथुन : गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 

कर्क : महत्त्वाची कामे शक्‍यतो उरकून घ्यावीत. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रवास टाळावेत. 

सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. अस्वास्थ्य जाणवेल. 

कन्या : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय उरकून घ्यावेत. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मनोरंजनाकडे कल राहील. 

तूळ : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नवीन कल्पना सुचतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. 

वृश्‍चिक : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

धनू : महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा करणे गरजेचे भासेल. सुसंधी लाभण्याची शक्‍यता आहे. वादविवादातील आपला सहभाग टाळावा. 

मकर : हितसंबंध वाढणार आहेत. इतरांवर प्रभाव राहील. अडचणीच्या काळात मित्रांची अपेक्षित मदत लाभेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. दुपारपूर्वी काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हितशत्रुंच्या कारवायांवर मात कराल. 

मीन : विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 

पंचांग
शुक्रवार : आषाढ कृष्ण 2, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.09, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय रात्री 9.08, चंद्रास्त सकाळी 8.02, भारतीय सौर आषाढ 28, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com