जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 सप्टेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 सप्टेंबर


दिनांक : 19 सप्टेंबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रत्येक क्षेत्रात सावधगिरीने पावले टाकावीत. ग्रहमान प्रतिकूल आहे. परंतु मनोबलाच्या जोरावर अडचणीवर मात कराल. 

वृषभ : बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. तुम्ही आपली मते व विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. 

मिथुन : महत्त्वाची कामे उरकून टाकावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमची वाटचाल बढतीच्या दिशेने चालू राहणार आहे. 

कर्क : गतिमानतेने कामे पार पाडाल. तुमचा उत्साह वाढणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. 

सिंह : येणाऱ्या काही सप्ताहांत आर्थिक क्षेत्रात प्रगती चालू राहणार आहे. सतत व्यवसायात लक्ष द्यावे. आर्थिक फायदा होईल. 

कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. धाडस टाळावे. प्रवास पुढे ढकलता आले तर योग्य ठरेल. कोणतेही साहस करू नका. 

तूळ : वरिष्ठांची साथ लाभणे अवघड आहे. तुम्हाला सतत येथून पुढे काही सप्ताह सर्व बाबतींत सावधगिरी बाळगावी लागेल. 

वृश्‍चिक : आगामी काही सप्ताह तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. शासकीय कामात यश लाभेल. 

धनू : व्यवसायात फार मोठी झेप घेऊ शकाल. थोड्या फार अडचणी राहतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल. 

मकर : दुपारी 3 नंतरचा कालखंड गाठीभेटी, पत्र व्यवहार, संपर्क यांसाठी विशेष यशदायक आहे. तुमची कामे मार्गी लागतील. 

कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. व्यवसायाच्या संदर्भात समाधानकारक स्थिती राहील. 

मीन : दुपारी 3 पूर्वीचा कालखंड हा आर्थिकबाबतीत चांगला आहे व लोकांचे संपर्क, गाठीभेटी यासाठी चांगला आहे. 

पंचांग 19 सप्टेंबर 2019 
गुरुवार ; भाद्रपद कृष्ण 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय रात्री 10.02, चंद्रास्त सकाळी 10.28, पंचमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 28, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com