जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : नवीन स्नेहसंबंध जुळतील. मनोरंजनाकडे ओढा राहणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 

वृषभ : अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. आर्थिक क्षेत्रात यश लाभणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

मिथुन : काही निर्णय धाडसाने घ्याल. विरोधकावर मात कराल. मनस्वीपणाने वागाल. 

कर्क : अपेक्षेपेक्षा आर्थिक क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. प्रॉपर्टी, साडी सेंटर यामध्ये यश मिळेल. 

सिंह : कसल्याही परिस्थितीत आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनातील उदासिनता जाऊन अनेक गोष्टीत यश मिळवाल. मात्र, प्रवास कटाक्षाने टाळावा. 

कन्या : थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. आरोग्य चांगले राहणार आहे. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. 

तूळ : तुम्हाला सर्वत्र व सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. आर्थिक क्षेत्रात आर्थिक लाभ उठवून घ्या. खर्चही खूप कराल. 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रॉपर्टीसाठी, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. 

धनू : नोकरी, व्यवसायात सुधारणा होईल. तुमची विचाराची दिशा योग्य असणार आहे. शासकीय कामात हळूहळू प्रगती होत राहणार आहे. 

मकर : शासकीय कामे पुढे ढकलावीत. मित्रांच्यासाठी खर्च करावा लागेल. अनेकांबरोबर मतभेद होतील. 

कुंभ : तुमचे धाडस फायदा देऊन जाणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात विचार करून पावले टाकावीत. 

पंचांग 20 ऑगस्ट 2019 
मंगळवार : श्रावण कृष्ण 5, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.19, सूर्यास्त 6.59, चंद्रोदय रात्री 10.08, चंद्रास्त सकाळी 10, भारतीय सौर श्रावण 29, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com