जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान 20 जानेवारी 2020 

मेष : प्रवासात काळजी हवी. वादविवादात सहभाग टाळावा. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल जाणार आहे. 

वृषभ : उत्साही राहणार आहात. उमेदीने कार्यरत रहाल. कामे मार्गी लावू शकणार आहात. 

मिथुन : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. 

कर्क : मनोबल उत्तम राहील. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. काहींना विविध लाभ होतील. 

सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. दैनंदिन कामे पूर्ण करू शकाल. 

कन्या : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. 

तूळ : जिद्द वाढणार आहे. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. गेली दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 

धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी. 

मकर : विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. 

मीन : मानसिक अस्वस्थता कमी होईल. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. 

पंचांग 20 जानेवारी 2020 
सोमवार : पौष कृष्ण 11, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय रात्री 2.52, चंद्रास्त दुपारी 2.32, षट्‌त्÷ितला एकादशी, भारतीय सौर पौष 30, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com