जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 नोव्हेंबर

bhavishya
bhavishya

दिनांक : 21 नोव्हेबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. 

वृषभ : व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कलाकारांना विशेष यश लाभेल. दिवस आनंदात जाणार आहे. 

मिथुन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. काही निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. 

कर्क : व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. उधारी, उसनवारी वसूल होईल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. प्रॉपटींच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

कन्या : काही लोकांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. खर्च आटोक्‍यात राहतील याकडे लक्ष द्यावे. कामाचा ताण जाणवणार आहे. 

तूळ : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : व्यवसायाचा वाढविण्यात यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल. 

धनू : तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढणार आहेत. काहींना प्रवासाचे योग येतील. कर्मचारी वर्गाकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. 

मकर : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

कुंभ : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी समस्या निर्माण होईल. वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील. कलाकारांना विशेष यश मिळेल. 

पंचांग 21 नोव्हेंबर 2019 
गुरुवार : कार्तिक कृष्ण 9, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.47, सूर्यास्त 5.55, चंद्रोदय रात्री 1.13, चंद्रास्त दुपारी 2.14, भारतीय सौर कार्तिक 30, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com