जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 ऑक्टोबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 ऑक्टोबर

दिनमान दि. 21 ऑक्‍टो. 19 
मेष : आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना घडतील. मनोबल उत्तम राहील. 

वृषभ : महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. 

मिथुन : महत्त्वाच्या आर्थिक़ कामांकरिता दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. 

कर्क : दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे आज नकोत. 

सिंह : दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मनोबल कमी राहील. 

कन्या : दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

तूळ : सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 

वृश्‍चिक : दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. नातेवाईक भेटतील. 

धनू : दैनंदिन कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना अस्वस्थता राहील. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. 

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे होतील. 

कुंभ : दुपारनंतर काहींना अनपेक्षित खर्च संभवतो. महत्त्वाच्या कामास विलंब संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 

मीन : महत्त्वाच्या निर्णयावर विचार करू शकाल. आगामी कामांचे नियोजन करू शकाल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. 

पंचांग 21 ऑक्‍टोबर 2019 
सोमवार : आश्‍विन कृष्ण 7/8, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.33, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय रात्री 11.55, चंद्रास्त दुपारी 1, कालाष्टमी, कराष्टमी, भारतीय सौर आश्‍विन 29, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com