जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 जुलै

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पंचांग 22 जुलै 2019 
सोमवार : आषाढ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.10, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 10.56, चंद्रास्त सकाळी 10.30, भारतीय सौर आषाढ 31, शके 1941.

आजचे दिनमान 
मेष : जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. विरोधकावर मात कराल. 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. कार्यरत असणाऱ्या क्षेत्रात गती लाभेल. 

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील कामे हळूहळू मार्गी लागतील. शासकीय कामांना चालना मिळेल. 

कर्क : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. 

सिंह : आरोग्याच्या संदर्भात तक्रारी जाणवण्याची शक्‍यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. वस्तू हरविणार नाही याची काळजी घ्यावी. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या कामात यश लाभेल. 

तूळ : धार्मिक क्षेत्रातील नवीन माहितीचा उलगडा होईल. सौख्य व समाधान लाभेल. विरोधकांच्या कारवायांवर मात कारल. 

वृश्‍चिक : भाग्यकारक घटना घडेल. घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील. अनपेक्षितरित्या सुसंधी सामोरी येईल. 

धनू : रखडलेली कामे मार्गी लावणे गरजेचे भासेल. अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास निराश होऊ नये. वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा करू नये. 

मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अनुभवामध्ये भर पाडणारी घटना घडेल. 

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. व्यवसायामधील कामे हळूहळू मार्गी लावू शकाल. नोकरीमध्ये निर्णय वरिष्ठांच्या संमतीनुसार घ्यावेत. 

मीन : मनाची चलबिचल आता संपणार आहे. आरोग्य चांगले राहील. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. 

पंचांग 22 जुलै 2019 
सोमवार : आषाढ कृष्ण 5, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.10, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 10.56, चंद्रास्त सकाळी 10.30, भारतीय सौर आषाढ 31, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 22 July 2019